कोल्हापूर:अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व समिती सदस्य यांच्या निवडीनंतरची जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची पहिली सभा आज शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता मा. शिल्पा शशिकांत खोत, सभापती जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती यांच्या अध्यक्षतेखाली मा. उपाध्यक्ष सर्व विषय समिती सभापती व समिती सदस्य, जिल्हास्तरीय तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्वर्गीय वसंतराव नाईक समिती सभागृह जि.प. कोल्हापूर येथे संपन्न झाली.

सभेतील प्रमुख मुद्दे खालील प्रमाणे
1. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करून जिल्ह्यातील सर्व गावांना तसेच वाडी वस्तीवर पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करण्यासाठीची सूचना सभेमध्ये देण्यात आली.
2. पाणीटंचाई निवारण पुरवणी आराखडा यादीमध्ये मा .जि प सदस्यांनी सुचित केलेल्या पाणीटंचाईग्रस्त गावांचा समावेश करावा
3. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करून घ्याव्या कामाची मुदत संपूनही योजना पूर्ण होत नसतील तर संबंधित योजनेच्या कंत्राटदारा यांचेवर दंडात्मक कार्यवाही करावी.
4.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत व्यक्तिगत शौचालय लाभार्थ्यास शौचालय पुनर्बांधणी करता प्रोत्साहन पर निधी मिळणेकामी पाठपुरावा करावा.
5.मनरेगा अंतर्गत रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घ्यावी तसेच नवीन विहीर योजनेमध्ये जुन्या विहिरीतील गाळ काढणे व विहिरीची दुरुस्ती करणे या बाबींचा समावेश करणेबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागवावे.
6. नळ पाणीपुरवठा योजनेच्या कनेक्शनचा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी.
7.सामाजिक वनीकरण विभागाने ज्या त्या ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार रोपमटिकेमध्ये उपलब्ध असणारी रोपे पावसाळ्यापूर्वी ग्रामपंचायतींना पुरवावी.
8.कृषी विभाग, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ विभाग व वन विभाग यांचे अधिकारी सभेस गैरहजर असलेने त्यांच्या अनुपस्थिती बाबत त्यांना नोटीस देण्यात यावी.
9.जिल्ह्यातील सर्व बंधाऱ्यांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करून घ्यावी.
श्री.अर्जुन गोळे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प.कोल्हापूर यांनी सभा खेळीमेळीत संपन्न झालेबद्दल सर्व उपस्थित मा.अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व समिती सदस्य व अधिकारी- कर्मचारी यांचे आभार मानले.
