कोल्हापूर:’गोकुळ’ निवडणुकीसाठी अद्याप अवधी आहे. ठराव होणे बाकी आहे. त्यामुळे गोकुळ निवडणुकीसाठीचा महायुतीमध्ये कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. बैठकही झालेली नाही. लवकरच जागा वाटपाबाबत बैठक होईल. महायुती म्हणूनच ‘गोकुळ’ची निवडणूक एकत्र लढणार आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. जि.प. अध्यक्षपदासह अन्य पदांच्या वाटपाबाबत निर्णय झालेला नाही. दोन्ही ठिकाणी महायुती म्हणूनच आम्ही एकत्र बसून समन्वयाने निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,
राज्यासह नगरपालिका, महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणे अपेक्षित होते. परंतु, ज्या ठिकाणी शक्य नाही तेथे निवडणुकीनंतर एकत्र येण्याचे ठरले होते. जिल्हा परिषदेमध्येही महायुती एकत्रच असेल. कोल्हापूर मनपामध्ये ज्याप्रमाणे पदांचे वाटप ठरले. त्यानुसारच जि.प.त होईल. महायुतीचे जिल्हा परिषदमध्ये ५१ सदस्य असून, पाच वर्षांत पदांचा फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्वच
अध्यक्षपदावर दावा नाही
शिवसेनेचा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे का, असा प्रश्न केल्यानंतर पालकमंत्री आबिटकर म्हणाले, आम्ही अध्यक्षपदावर सध्या तरी दावा केला नाही; पण आमचे समन्वयाने काम करण्यास प्राधान्य आहे.
