मंत्री प्रकाश आबिटकरांनी कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक २० मधील नागरिकांशी साधला संवाद

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक २० मधील नागरिकांशी संवाद साधला.

राधानगरी भुदरगड तालुक्यामधील अनेक नागरिक या ठिकाणी वास्तव्य करून आहेत. नोकरी-व्यवसायानिमित्त कोल्हापूर शहरात स्थलांतरित झालेल्या या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी पुईखडी इथल्या संकल्प सिद्धी मंगल कार्यालयात विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपनगरांच्या विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा राबवण्याचा मानस असल्याचे स्पष्ट करत, हा संकल्प सिद्धीस जाण्यासाठी महापालिकेत समविचारी नगरसेवकांची गरज असल्याने महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन मंत्री आबिटकर यांनी नागरिकांना केले.

या कार्यक्रमास आमदार अमल महाडिक, महायुतीचे उमेदवार  अभिजीत खतकर, गोकुळचे संचालक . नंदकुमार ढेंगे , शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष  विजय बलुगडे, शिवसेना नेते श्री. हर्षल सुर्वे,  सुनील वाडकर, बाबा नांदेकर,  अभय तेंडुलकर, श्रीमती अमरजा पाटील,  सुषमा जाधव,  सुरेखा ओटवकर, नेहा तेंडुलकर, वैभव कुंभार तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

🤙 8080365706