माजी नगरसेवक रहिमान हसनअल्ली हकीम यांचे निधन

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि माजी परिवहन सभापती रहिमान हसनअल्ली हकीम यांचे वयाच्या 69 व्या वर्षी खासगी इस्पितळात उपचार सुरु असताना निधन झाले.

युवक काँग्रेस सरचिटणीस म्हणून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात करणाऱ्या हकीम यांनी शहर झोपडपट्टी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती. 1985 ते 1990 या कालावधीत सदर बाजार प्रभागाचे नगरसेवक राहिलेले रहिमान हकीम 1989 ते 1990 मध्ये परिवहन समितीचे सभापती होते.
त्यांच्या पश्चात तीन पत्नी, चार मुले, तीन विवाहित मुली, सुना नातवंडे, जावई असा परिवार आहे.

🤙 8080365706