इंडियन आर्मीत निवड झालेल्या रोहित माळी यांचे कुंभोज नगरीत उद्या होणार स्वागत

कुंभोज ( विनोद शिंगे)
कुंभोज गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाया रोहित विजय माळी यांची इंडियन आर्मी निवड झाली. त्यांनी आपले ट्रेनिंग पूर्ण करून तो उद्या कुंभोज येथे परतणार आहे. त्याच्या स्वागताची ग्रामीण भागातील जलत तयारी करण्यात आली असून रोहित विजय माळी यांच्या रूपाने कुंभाज गावच्या शिरपेचात पुन्हा एकदा मनाचा रोवला गेला असल्याची माहिती ग्रामस्थातून मिळत आहे .

उद्या शनिवार रोजी दुपारी तीन वाजता कुंभोज ग्रामस्थाच्या वतीने रोहित विजय माळी याचे कुंभोज येते भव्य स्वागत करण्यात येणार असून दसरा चौकातून त्याची मिरवणूक करण्यात येणार आहे. रोहित याच्या सत्कार समारंभासाठी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती रोहितचे वडील विजय माळी यांनी दिली आहे.विनोद शिंगे कुंभोज

🤙 9921334545