न्यू डायमंड कडून छ. संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर

सातवे प्रतिनिधी (किशोर जासूद)

न्यू डायमंड स्पोर्ट्स मार्फत छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रम प्रतिमपूजन संजयकुमार जाधव , वसंत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात १५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले.

अर्पण ब्लड बँक यांनी रक्त संकलन केले रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना भेट म्हणून वॉटर टँक भेट देण्यात आला. न्यू डायमंड स्पोर्ट्स अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व आजी माजी खेळाडू आणि ग्रामस्थांच्या योगदानामुळेच हे शिबिर यशस्वीरीत्या पार पाडता आले.

सातवे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना वॉटर टॅंक भेट देताना भानुदास पाटील व मान्यवर मंडळी

🤙 9921334545