कोल्हापूर : कोपार्डे येथे कोपार्डे प्रीमियर लीग ‘ नवसिद्धी चषक 2025 ‘ क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाला आमदार चंद्रदीप नरके उपस्थित राहिले.
ग्रामीण भागातील खेळाडू अतिशय प्रतिभावंत आहेत, त्यांच्या सुंदर खेळाचा मनमुराद आनंद घेतला. अशा स्पर्धेला मी नेहमीच प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतो. डॉ. अमित पाटील विनायक पाटील, नवसिद्धी स्ट्रायकर ची पूर्ण टीम आणि छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण मरगाई मंदिर कमिटी यांनी या स्पर्धेचे अतिशय सुंदर नियोजन केल्याचे आ. चंद्रदीप नरके यांनी सांगितले.
स्पर्धेमध्ये सर्वच संघांनी चांगला खेळ केला, राजेश्री शाहू संघ विजेता तर नवसिद्धी स्ट्रायकर हा संघ उपविजेता ठरला. तर शाहू नगर स्ट्रायकर आणि हनुमान तालीम तृतीय आणि चतुर्थ क्रमांकावर राहिले