छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक आग्रा शहरात उभारणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला 395 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने आग्रा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते की, आग्रा शहरात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवले होते, ती वास्तू महाराष्ट्र शासनामार्फत अधिग्रहीत करून तेथे भव्य स्मारक उभारण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल. या आश्वासनाची पूर्तता करणारा हा शासन निर्णय…

 

 

या निर्णयाचे महत्त्व:
▪️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक पराक्रमाचे जतन व प्रचार-प्रसार
▪️महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि पर्यटन क्षेत्राचा विकास
▪️आग्रा येथील ऐतिहासिक स्थळी महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठसा