कुंभोज ( विनोद शिंगे)
मांगले (ता.शिराळा) गावचा सुपुत्र,क्रिकेट खेळाडू विजय जयसिंग पावले याने इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजेच “आयएसपीएल” क्रिकेट स्पर्धेमध्ये सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या मालकीच्या मुंबई संघाकडून कर्णधार म्हणून खेळताना सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी कर्णधार विजय पावले यांचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्वसामान्य कुटुंबातील विजय जयसिंग पावले यांने मिळवलेल यश निश्चितच कौतुकास्पद आहे. तसेच विजय भविष्यात मिळेल त्या संधीचे नक्कीच सोने करेल आणि वारणा परिसराचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवेल असा विश्वास आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी व्यक्त केला…*
*यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदूरकर (आप्पा),वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते