दूध साखर बिद्री महाविद्यालयातील प्रा. महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या नराधमाला सेवेतून बडतर्फ करा – अभिजित राऊत

कोल्हापूर – दूध साखर महाविद्यालय बिद्री कोल्हापूर येथील एक प्राध्यापक महोदय महिलेशी अश्लील चाळे करताना रंगेहात सापडले सदर महिलेने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर महाशय (कल्लाप्पा सनदे) दोन महिने जेलची वारी करून आले आहेत. असे असताना महाविद्यालयाने सेवेतून निलंबित करणे गरजेचे असताना देखील निलंबित केलेले नाही असे कळते.

 

 

 

 

हे कायद्याला धरून नाही ,महाविद्यालय प्रशासनाने सदर कलंकित प्राध्यापकाला पुन्हा रुजू केले असे कळते.या प्रसंगी महाविद्यालय प्रशासन कर्तव्यात कसुर करताना दिसते तरी विभागीय सहसंचालक या नात्याने तुम्ही या प्रकरणात प्रत्यक्ष लक्ष घालून सदर सेवेतून बडतर्फ करण्यात यावा व महाविद्यालयाचे लेखा परीक्षण करून सदर महाविद्यालयाबाबत वारंवार तक्रार येत आहेत. सदर महाविद्यालयावर प्रशासक नेमावा व महाविद्यालयात चाललेल्या घोटाळ्या बाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अशा प्राध्यापका विरोधात व महाविद्यालय विरोधात योग्य ती कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छडेल याची दखल घ्यावी.