सर्वसामान्य इंजिनिअरिंगच्या मुलाला आ.  विनय कोरे यांच्याकडून लॅपटॉप भेट

कुंभोज  (विनोद शिंगे)
तासगांव (ता.हातकणंगले) येथील कु.शिवप्रसाद उदय सुतार हा तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत आहे.आमदार डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते त्याला लॅपटॉप भेट देण्यात आला.

 

 

हातकणंगले तालुक्यातील तासगांव येथील कु.शिवप्रसाद उदय सुतार इंजिनिअरिंग विभागात शिकत आहे.इंजिनिअरिंग विभाग ह्या क्षेत्रात लॅपटॉप ह्या उपकरणाची अत्यंत गरज असते पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लॅपटॉप घेऊन देण्यासारखी नव्हती. त्यामुळे त्यांने ज्योतिरादित्य फौंडेशन, कोडोली यांच्याकडे मदतीसाठी विनंती केली होती. ज्योतिरादित्य फौंडेशन, कोडोली यांच्यावतीने कु.शिवप्रसाद उदय सुतार यांस आमदार डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते लॅपटॉप भेट देण्यात आला. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आमदार डॉ.विनय कोरे यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री वारणा सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रमोद कोरे,ज्योतिरादित्य फौंडेशनचे अध्यक्ष प्रा.बी.टी.साळोखे ,कोडोली गावचे माजी सरपंच शंकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545