कुंभोज (विनोद शिंगे)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कुंभोज या ठिकाणी विजयस्तंभ उभा करून भिमा कोरेगाव शौर्य दिना निमित्त त्या 500 शूरवीरांना त्यांच्या शौर्याला मानवंदना करण्यात आली.


यावेळी सुशांत कोले व प्रमोद डोणे यांनी विजयस्तंभास पुष्पहार अर्पण केले, व दीप प्रज्वलन नितीन कोले अनिकेत तरुण नाडे यांनी केले, नव वर्षांच्या शुभेच्छा सहित आभार व मनोगत रत्नदीप डोणे यांनी व्यक्त केले,तसेच बौद्ध समाज कुंभोज मधील सर्व तरुण व प्रमुख लोकं उपस्थित होते
