कुंभोज (विनोद शिंगे)
नांदणी येथे जैन धर्माच्या महान परंपरेतील अत्यंत पवित्र अशा पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवाचा भव्य शुभारंभ झाला. या मंगल प्रसंगी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेबांनी आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाचा गौरव वाढवला.


आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेबांनी आचार्य श्री 108 विशुद्ध सागर महाराज जी व स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी यांच्या प्रेरणादायी उपदेशांचे श्रवण केले तसेच 80 हून अधिक मुनी आणि माताजींचे पवित्र दर्शन घेतले.
या सोहळ्यासाठी पंचकल्याणक महोत्सव कमिटीचे पदाधिकारी, जैन समाजातील प्रमुख व्यक्ती, भगिनी, श्रावक-श्राविका, तसेच दूरवरून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचकल्याणक महोत्सव हा जैन धर्मातील एक अद्वितीय असा कार्यक्रम असून, यात जिनेश्वर भगवानाच्या जीवनातील पाच प्रमुख घटनांचे पूजन व महोत्सव साजरा केला जातो. महामस्तकाभिषेकासारख्या विधीमध्ये धर्माची गोडी आणि परंपरेची अनुभूती मिळते.
आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांनी समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना सातत्याने पाठिंबा दिला आहे. या महोत्सवाने समाजात आध्यात्मिक उन्नती व धार्मिक एकतेचा संदेश दिला आहे.
