विषबाधा होऊन सख्ख्या भावंडांचा अंत ; पेस्ट्री केक खाल्याने झाली विषबाधा

कोल्हापूर : जिल्ह्यातील चिमगाव ( ता. कागल) येथील सख्ख्या बहीण भावाचा पेस्ट्री केक खाल्याने विषबाधा होऊन अंत झाला. सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे.

 

चिमगांव येथील रणजित नेताजी आंगज यांचा मुलगा श्रेयस (वय ४) आणि मुलगी काव्या ( वय ७) असे मृत्युमुखी पडलेल्या सख्ख्या बहीण भावांचे नाव असून, पेस्ट्री केक खाल्यावर त्या दोघांना जूलाब ,उलट्या सुरु झाल्या उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असताना उपचारादरम्यान त्याचा करुण अंत झाला आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे अख्ख्या गावावर शोककळा पसरली आहे.

🤙 9921334545