महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ संघास सर्वसाधारण विजेतेपद

कोल्हापूर :  आचार्य नागार्जुन युनिव्हर्सिटी गुंटूर आंध्र प्रदेश येथे संपन्न झालेल्या साऊथ वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत आपल्या शिवाजी विद्यापीठ महिला संघाने *एक सुवर्ण, एक रौप्य व एक ब्राँझ पदकासह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.त्याचबरोबर सर्व दाही खेळाडूंची निवड सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी झाली.
सर्व खेळाडूंना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . डी. टी.शिर्के, प्र कुलगुरू डॉ. पी. सी. पाटील, रजिस्ट्रार डॉ. व्हि. एन. शिंदे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, प्रशिक्षक डॉ. प्रशांत पाटील व डॉ. रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
 यशस्वी खेळाडू – काजल सरगर – सुवर्ण पदक
भूमिका मोहिते – रौप्य पदक
निकिता कमलाकर – कास्य पदक
सरिता सावंत – चतुर्थ
 राजनंदिनी आमणे – चतुर्थ
 प्राजक्ता साळुंखे – पाचवी
साक्षी संदुगडे – सातवी
 अपेक्षा ढोणे – आठवी
राजलक्ष्मी पवार – बारावी
स्नेहा आमणे – चौदावी