कुंभोज (विनोद शिंगे )
हातकणंगले विधानसभा मतदारसंघात जातीची समीकरणाचे गणित बसणार का ? याची सर्वत्र चर्चा असून माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. हातकणंगले येथे अटीतटीच्या लढती होणार असून ह्या लढतीत तिरंगी झाली असल्याचे चित्र दिसत आहे.
हातकणंगले मतदारसंघातील हुपरी परिसरातील तेरा गावातील मताकडे तिन्ही उमेदवारांचे लक्ष लागून राहिले असून ,या पट्ट्यातील मते नेमकी कोणाला मिळतील, याबाबत अंदाज घेतले जात आहेत, या पट्ट्याच्या उमेदवाराला चांगली मते मिळते त्याचा विजय सुखर होण्यास मदत होणार आहे. परिणामी हातकणंगले मतदारसंघात एकूण 334 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी 31 मतदान केंद्रावर पुरुषांपेक्षा महिला मतदारांनी जास्त मतदान केल्याने लाडक्या बहिणीचा परिणाम असल्याची चर्चा दिसत आहे.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघात अंतिम टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत झाली आहे. तिरंगी लढतीत वाढलेले तीन टक्के मतदान मतदानातील उत्साह, ईर्षा आणि चुरस पाहता काँग्रेसचे राजूबाबा आवळे यांनी जनसुराज शक्तीचे अशोकराव माने यांच्यात अटीतटीची लढत झाली असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉ. सुजित मिंणचेकर हे किती आणि कोणाची मते घेणार यावरच निकाल ठरणार आहे. हातकणंगले मतदारसंघात आमदार राजूबाबा आवळे यांची पाच वर्षात केलेली विकासकामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. मतदारसंघातील 57 गावांमध्ये 255 कोटीची विकासकामे करून त्यांनी जनतेबरोबरच ती मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच पुढील विकासासाठी वचनबद्ध असल्याची गॅरंटी देत त्यांनी मतदारांना पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्रातील जनसुराज पक्षाचे उमेदवार अशोकराव माने यांनी 2019 ला पराभव झाल्यानंतर देखील पाच वर्षात मतदारसंघांमध्ये संपर्क ठेवून महायुतच्या माध्यमातून विकासकामे केली. सता द्या विकासाची नवे पर्व सुरू करू अशी आश्वासन देत. त्यांनी मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला.स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुजित मिंचेकर हे आमदारकीच्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणूक लढवत आहेत मतदार संघाच्या विकासात्मक चेहरा ठरवण्यासाठी साथ देण्याचे आव्हाने त्यावेळी त्यांनी केले. महाविकास आघाडीच्या प्रचाराची दोरा माजी मंत्री जयवंतराव आवळे खानापूरचे माजी आमदार अंजली निंबाळकर माजी आमदार राजु आवळे,संजय आवळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान जाधव वाडगाव चे माजी नगराध्यक्ष विद्याताई पोळ नगराध्यक्ष अर्चना जानवेकर शिरोली माजी सरपंच शशिकांत खवरे उद्धव सेनेचे सातापा भवन यांच्यासह नेते आणि कार्यकर्ते यांनी सांभाळली.
जनस्वराज्य उमेदवाराची धुरा खासदार धैर्यशील माने, भाजपचे अरुण इंगवले, अमर पाटील ,महाडिक गटाचे मार्केट कमिटी अध्यक्ष सुरेश पाटील, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, वारणा दूध संघ संचालक अरुण पाटील, महावीर पाटील, माणगावचे सरपंच राजू मगदूम, विलास खानविलकर, अभय काश्मि,रे वडगावच्या माजी उपनगराध्यक्ष प्रणिता सालपे यांच्यासह अनेक नेत्यांनी सभाळली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सूचित मिणचेकर यांच्या प्रचाराची धुरा त्यांचा मुलगा पार्थ मिणचेकर जिल्हा परिषद शिक्षण समिती प्रवीण यादव ,माजी सभापती राजेश पाटील लोकसभेचे अरुण मगदूम, तालुकाध्यक्ष आप्पा एडके यांच्यासह शेतकरी संघटनेचे नेते मिणचेकर यांच्यावर होती. वंचित आघाडीच्या डॉक्टर क्रांती सावंत व शिवाजी आवळे आधी उमेदवारांनी देखील आपल्या पातळीवर प्रचार यंत्रणा राबवली.