डॉ. अशोकराव मानेंच्या प्रचारार्थ शिरोली पुलाची येथे जाहीर सभा

कोल्हापूर : हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. अशोकराव माने यांच्या प्रचारार्थ शिरोली पुलाची येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक उपस्थित राहिले.

 

 

धनंजय महाडिक म्हणाले, डॉ. अशोकराव माने हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व आहेत. मतदारसंघातील सर्व समस्यांची जाणीव डॉ. माने साहेब यांना आहे. गेले पाच वर्षे माने हे प्रत्येक नागरिकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांच्या समस्या सोडवतात. प्रत्येक नागरिकाला मदतीसाठी तत्परतेने धावून जातात व सर्वांना मदत करतात.

महायुती सरकारच्या कालावधीमध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघासाठी लोकप्रतिनिधी नसताना देखील डॉ. माने साहेब यांनी भरीव निधी राज्य सरकारकडून मंजूर करून आणला आहे. त्यामुळे हातकणंगले तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. म्हणून आगामी काळात या मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मा. डॉ. अशोकराव माने साहेब यांना प्रचंड मतांनी विजयी करूया, असे आवाहन यावेळी केले.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, सरपंच पद्मजा करपे, राजेश पाटील, दिलीप पाटील , मुरलीधर जाधव
यांच्यासह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.