क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथील तळमजल्यावर उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. 

 

 

 

 

यावेळी जिल्हा परिषदेचे ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), जिल्हा परिषद, कोल्हापूर तसेच श्री. अर्जुन गोळे**, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुषमा पाटील, अध्यापिका, मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर यांनी केले.

 

कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील व समाजकार्यातील योगदानाचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.

🤙 8080365706