अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत खेबवडे येथे सभा

कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ खेबवडे येथे सभा संपन्न झाली. यावेळी खासदार धनंजय महाडिक उपस्थित राहून त्यांनी पस्थित जनसमुदायाशी संवाद साधला.

 

 

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमल महाडिक यांचा पराभव झाला. तरी देखील या पराभवाने खचून न जाता त्यांनी संपूर्ण दक्षिण मतदारसंघात सतत जनतेची कामे करत राहिले. परंतु काँग्रेसच्या आमदाराने महाविकास आघाडी सरकारच्या काळात मतदारसंघात एकही काम केलेलं नाही. हा फरक सुज्ञ जनता जाणून आहे. म्हणून येत्या 20 नोव्हेंबर रोजी ‘कमळः या चिन्हासमोरील बटण दाबून 2024 च्या निवडणुकीत अमल महाडिक यांना पुन्हा आमदार करूयात, असे आवाहन यावेळी धनंजय महाडिक यांनी केले.

यावेळी मीनाक्षी महाडिक, शौमिका महाडिक, पद्मजा करपे, संध्याराणी बेडगे, प्रताप पाटील, शामराव शिंदे, शाहू चव्हाण, रमेश चौगुले, राणी लोहार, संजीवनी चौगले, संदिप पाटील, प्रताप मगदूम, आप्पासो चौगुले, सुभाष पाटील,. चंद्रकांत जाधव, मधुकर हावालदार, सर्जेराव पाटील, धिरज मगदूम, अमृत जाधव, शिवाजी चौगले, विश्वास चौगले, विक्रम कांबळे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706