राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या माध्यमातून जयसिंगपूर शहरातील अद्यावत राजर्षी शाहू स्टेडियम साकारतंय

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी वसवलेल्या जयसिंगपूर शहरांमध्ये दसरा चौक परिसरात राजर्षी शाहू स्टेडियम आहे, पण मागील अनेक वर्ष या स्टेडियमचा म्हणावा तितका विकास झाला नव्हता,आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून आज जवळपास 28 कोटी रुपये खर्च करून राजर्षी शाहू स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बनवण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

 

 

या स्टेडियमवर दिवस रात्र सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारासाठी आवश्यक ती अद्यावत लाईट व्यवस्था सुरू केली आहे, लवकरच या उत्कृष्ट लॉन आणि दर्जेदार खेळपट्ट्या तयार केलेल्या स्टेडियमवर क्रिकेटचे रणजी सामने खेळवले जातील, या स्टेडियम मध्ये होणारे प्याव्हेलियन अतिशय आधुनिक आणि सर्व सोयीनी युक्त असणार आहे, क्रीडा क्षेत्रातील सर्व प्रकारच्या खेळाडूंना या ठिकाणी इंनडोअर सराव करता येणार आहे, राजर्षी शाहू स्टेडियम कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट स्टेडियम म्हणून येणाऱ्या काळात आपली ओळख निर्माण करेल.

🤙 8080365706