राजूबाबा आवळे यांच्या प्रचारार्थ प्रियांका आवळेंनी साजणी आणि इंगळी गावामध्ये दिली भेट

कोल्हापूर: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे . येत्या २० नोव्हेंबर ला मतदान असून महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार प्रचार सभा ,पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधत आहेत. गावोगावी प्रचारसभा घेण्यात येत आहेत. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजूबाबा आवळे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सौभाग्यवती प्रियांका आवळे यांनी साजणी आणि इंगळी या गावामध्ये भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला.

 

 

 

यावेळी प्रियांका आवळे यांनी राजूबाबांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केलेले आहेत त्यामुळे नागरिकांनी राजूबाबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याचे आश्वासन दिले. मतदारसंघातील विकास कामाचा आलेख असाच पुढे चालू रहावा यासाठी जास्तीत जास्त मताने राजूबाबा यांना निवडून देण्याचे प्रियांका आवळे
यांनी आवाहन केले…