कोल्हापूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पन्हाळा आणि शाहुवाडी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार सत्यजीत पाटील- सरूडकर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही उपस्थितांनी दिली.

यावेळी बाळासाहेब सरनाईक, जयसिंगराव हिर्डेकर, माणिक पाटील यांच्यासह दोन्ही तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकाऱी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
