राजूबाबा आवळे यांना आरपीआय खरात गटाचा पाठिंबा

कोल्हापूर : आरपीआय खरात गटाचे जिल्हाध्यक्ष व चोकाक गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हर्षद कांबळे यांनी हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार राजूबाबा आवळे यांनाजाहीर पाठिंबा दिला.

 

 

यावेळी आवळे म्हणाले, या पाठिंब्यासाठी मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे आणि विजयासाठी त्यांनी केलेल्या या निर्णयाचे स्वागत करतो.आता आपण सर्वांनी मिळून, मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे आणि एकजुटीने काम करू.आपल्या सर्वांच्या सहकार्याने विजय निश्चितच आपलाच असेल याची मला खात्री आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी अतिग्रे गावचे ऍडव्होकेट चिंतामणी कांबळे, उपसरपंच संदीप सूर्यवंशी, हातकणंगले तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश ममधाळे उपस्थित होते.

🤙 8080365706