शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राला मोठा धक्का : आ. अमल महाडिक

कोल्हापूर: देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणारे शिक्षण महर्षी, पद्मश्री *डॉ. डी. वाय. पाटील* यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने केवळ कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय इतिहासात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

 

 

 

गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी सुरू केलेले अभिमत विद्यापीठ आज शिक्षण क्षेत्रातील एक मानदंड बनले आहे. शिक्षणासोबतच विविध सामाजिक विषयांमध्ये डॉ. पाटील नेहमी आघाडीवर असायचे. अध्यात्म हा त्यांचा आवडीचा विषय होता.

 

अशा या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने समाजाची अपरिमित हानी झाली आहे.

 

याबाबत शोक व्यक्त करताना कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक म्हणाले, “ज्ञानसूर्य मावळला आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो हीच प्रार्थना.”

 

🤙 8080365706