राहुल आवाडेंच्या प्रचारार्थ भाजपा इचलकरंजी शहर कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद

कोल्हापूर: इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी व भाजपा विधानसभेच्या निरीक्षक, आमदार शशिकला जोल्ले यांनी भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

 

 

याप्रसंगी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करताना राहुल आवाडे म्हणाले की, भाजपची विचारधारा आणि योजनांमुळे सामान्य माणसाच्या जीवनात सुधारणा होणार आहे. प्रचारास अधिक चांगला वळण देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी अधिक ऊर्जा आणि एकजुटीने काम करावे, असे आवाहन भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांनी केले.

यावेळी भाजप शहराध्यक्ष पै. अमृतमामा भोसले, प्रितम बोहरा, दिलीप मुथा, चंद्रकांत पाटील, अभय पाटील, शहाजी भोसले, महावीर जैन, उदय चौगुले, संजय मगदूम, मोहन चौगुले, भाजप महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

🤙 8080365706