कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील डॉक्टरांची एकत्रित बैठक घेतली.

यावेळी उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. महायुती सरकारच्या काळात डॉक्टरांसाठी सुरू असलेले विविध शासकीय योजना तसेच येणाऱ्या काळात राबविले जाणारे योजना व उपक्रम याबद्दलही यावेळी चर्चा करण्यात आली.
