मुश्रीफांना १०० टक्के मतदान करण्याचा मुम्मेवाडीकरांचा निर्धार

मुम्मेवाडी: गेली अनेक वर्ष गटा-तटाच्या राजकारणामध्ये गुरफटलेलं गाव… एकमेकांच्या कायमपणे विरोधात लढणे, हे इथल्या प्रत्येक माणसांमध्ये रुजलेलं होतं. मात्र; येथील ग्रामदैवत श्री. भावेश्वरीच्या मंदिर जीर्णोद्धाराच्या निमित्ताने सर्व हेवेदावे बाजूला ठेवून सर्व प्रमुख नेत्यांसह गावकरी एकजूट झाले. यातच मला आनंद आहे. म्हणूनच मुमेवाडीकरांच्या या एकजुटीला माझा सलाम करीत आहे. मी मुमेवाडीकरांच्या अतूट एकीपुढे नतमस्तक होतो.असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

 

मुम्मेवाडी ता. आजरा येथे प्रचार दौर
यावेळी आजरा साखर कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, शिरीष देसाई, दीपक देसाई, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काशिनाथ तेली यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रचार सभेत हसन मुश्रीफ याना विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार मुम्मेवाडी ग्रामस्थांनी केला आहे.

मुमेवाडी ता. आजरा येथील ग्रामदैवत श्री. भावेश्वरी मंदिरासाठी एक कोटी रुपयांचा निधी याआधी मंजूर केला आहे. अभिनंदनाचा ठराव यावेळी जोरदार टाळ्यांच्या गजरात झाला. संपूर्ण गावाने पाठीशी राहण्याचा निर्धार केला. या मंदिर आणि परिसर सुशोभीकरणाच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे जाहीर केले.

मुम्मेवाडी गावचे ग्रामदैवत असलेले श्री. भावेश्वरी मंदिर जीर्ण झाले होते. या मंदिराला निधी उभा करण्याचे आव्हान ग्रामस्थांसमोर उभे होते. आचारसंहिता लागण्यापूर्वी ग्रामस्थ मुश्रीफ यांच्याकडे आल्यानंतर ताबडतोब त्यांना निधी मंजूर करून दिला.

यावेळी बबन पाटील, रामदास साठे, सचिन परीट, विश्वासराव देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच सुरेखा पाटील, विजय गुरव, पंढरीनाथ पाटील, गणपती राजगिरे, आनंदा करंबळे, गणेश पटेल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.