गांधीनगरमधील कार्यकर्त्यांचा काँग्रेसला रामराम; ऐन निवडणुकीत ऋतुराज पाटील यांच्या अडचणी वाढल्या!

कोल्हापूर: गांधीनगर मधील कट्टर सतेज आणि ऋतुराज पाटील समर्थक समजले जाणारे काँग्रेसचे कार्यकर्ते भारत कांबळे, राहुल कांबळे, बाबासाहेब कांबळे, गिरीश कांबळे,अविनाश कांबळे, सारंग कांबळे, निलेश पोवार, सतीश यादव, संदीप घाटगे, हेमंत कांबळे, पूजा कांबळे, नम्रता माळवी, सपना पवार, विद्या पाटोळे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीत शाहूपुरी इथल्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी पक्षप्रवेश केला.

 

 

ऋतुराज पाटील यांच्या निष्क्रियतेमुळे कामे होत नव्हती. प्रत्येक वेळी दुजाभावाची वागणूक दिली जायची त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. अमल महाडिक यांच्या विकासात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवून भविष्यात वाटचाल करणार असल्याचेही ते म्हणाले.