शौमिका महाडिक यांची नंदगाव येथील सामाजिक उपक्रमास उपस्थिती

कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नंदगाव इथल्या प्रा. वसंत हंकारे यांच्या वतीने आयोजित सामाजिक उपक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शौमिका महाडिक उपस्थित होत्या. या कार्यक्रमात महिलांना साडी वाटप, विद्या मंदिर नंदगावच्या विद्यार्थ्यांना आयडेंटिटी कार्ड वाटप असे विविध उपक्रम पार पडले.

यावेळी शौमिका महाडिक यांनी सामाजिक भान राखत हंकारे यांनी राबवलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे,असे मत व्यक्त केले. यावेळी उपसरपंच मदन चौगले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते