प्रकाश आबिटकरांच्या हस्ते बनाचीवाडी येथील लघु पाटबंधारे तलाव प्रकल्पाचा शुभारंभ

कोल्हापूर : 36 कोटी 62 लाखांच्या निधीतून 228 हेक्टर सिंचन क्षमतेच्या लघु पाटबंधारे तलाव, बनाचीवाडी (ता. राधानगरी) या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.

 

 

या प्रकल्पामुळे सिंचन क्रांतीचा नवा अध्याय सुरु होऊन शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल, ज्यामुळे उत्पादनक्षमता वाढून आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील विकासाचे स्वप्न आता साकार होत आहे.