कुंभोज( विनोद शिंगे)
जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक,माजी मंत्री व आमदार डॉ विनयराव कोरे ,खासदार धैर्यशील माने व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते जिल्हा परिषद सदस्य डॉ अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नातून तांडा वस्ती योजनेतून व 15 व्या वित्त आयोगातून शाळा दुरुस्ती संविधान दालन बनविणे तिळवणी ता. हातकणंगले या गावच्या विकास कामांसाठी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
या विकास कामांचा उदघाटन सोहळा हातकणंगले विधानसभा प्रमुख दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापू) यांच्या शुभहस्ते व लोकनियुक्त सरपंच राजेश पाटील व उपसरपंच दीपक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी चंद्रकांत चौगुले,जेष्ठ नेते माजी उपसरपंच सुकुमार चव्हाण,ग्रा प सदस्य निवास कोळी,विजय कदम*,युवा नेते योगेश कुंभार,ग्रा प सदस्या सौ नीता चव्हाण,सौ शबाना एकसंबे,बाबुराव जाधव,अविनाश कांबळे, गायकवाड सर यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला भगिनी,पत्रकार बंधू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.