राहुल पाटील यांच्या हस्ते भुयेवाडीत विविध विकासकामांचे उद्घाटन

कोल्हापूर: भुयेवाडी, ता. करवीर येथे निष्ठावंत नेते स्व. आ. पी. एन. पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. सतेज पाटील यांच्या विकास निधीतून साकार झालेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

यावेळी सरपंच सचिन देवकुळे, संभाजी खोत,  सतीश पाटील, सुनील पाटील, जयवंत चौगले, गणेश माने या मान्यवर लोकांसह गावकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.