ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत हणबरवाडीत विविध विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील हणबरवाडी (ता. करवीर) येथे 45 लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.

 

हणबरवाडी फाटा येथे संरक्षक भिंत बांधणे, रस्ता करणे, रस्ता डांबरीकरण, प्राथमिक शाळा व अंगणवाडी इमारत दुरुस्त करणे आदी विकासकामांचा यामध्ये समावेश आहे.

सरपंच कुमार कोराणे, उपसरपंच बाबुराव वाडकर, माजी सरपंच चंद्रकांत कद्रे, सरदार तिप्पे, गणपती लव्हटे, बाजीराव वाडकर, अरुण पाटील, सर्जेराव ढेंगे, सुनिता लव्हटे, युवराज ढेंगे, संदीप ढेरे, उमेश वाडकर, तानाजी व्हनाळे, उमेश व्हनाळे, मारुती वाडकर, आनंदा ढेरे, दिलीप पाटील, सरदार वाडकर, अरविंद पाटील, अभिजीत वाडकर, किरण कोराणे, हणमंत वड्डशिंदे, सुकुमार भोसले, अमृत खोत व ग्रामस्थ् याप्रसंगी उपस्थित होते.