समरजित घाटगेंच्या उपस्थितीत रणदिवेवाडीत विकासकामांचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर : कागल तालुक्यातील रणदिवेवाडी गावात विविध विकासकामांचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा समरजित घाटगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 

 

सदर गावात सर्वांगीण विकास साधण्यासाठी समरजित घाटगे यांनी १ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना  नागरिकांशी संवाद साधण्याचा योग आला.यावेळी आम्ही भविष्यातही सदैव आपल्या सेवेत तत्पर राहू, असा शब्द समरजित घाटगेंनी दिला.