कळंबा येथील विविध विकासकामांचा उदघाटन सोहळा आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) येथे 45 लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा उदघाटन सोहळा आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.

 

 

यामध्ये समाजमंदिर बांधणे, तालीम बांधकाम करणे, रस्ता करणे, गटर्स, पाण्याची टाकी बांधणे आदी विकासकामांचा समावेश आहे.

यावेळी सरपंच सुमन गुरव, उपसरपंच सोनल शिंदे, माजी सरपंच सागर भोगम, शशिकांत तिवले, दिलीप टिपुगडे, शिवाजी कांबळे, उदय जाधव, विकास पोवार बावडेकर, रोहीत मिरजे, संदीप पाटील, इंद्रजित जाधव, उत्तम जाधव, मनोज टिपुगडे, धर्मेंद्र गौड, रोहीत जगताप, संजय माने, रोहन रोपळकर, संग्राम चौगुले, सोमनाथ शिंदे, सुहास जंगम, विजय खानविलकर, प्रकाश पाटील, सर्जेराव साळोखे, दत्तात्रय तिवले वस्ताद यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.