शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त चेतन नरकेंनी घेतली विविध मंडळाची भेट

कोल्हापूर : संपूर्ण राज्यात सध्या मोठ्या उत्साहात व आनंदात शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवानिमित्त चेतन नरके यांनी चॅलेंज ग्रुप, गुलाब गल्ली, मंगळवार पेठ मंडळास भेट दिली. यावेळी तेथील दुर्गा मातेचे मनोभावे दर्शन घेतले व आरती केली. तसेच देवीच्या चरणी नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

 

 

यावेळी उपस्थित युवकांशी त्यांनी विविध सामाजिक विषयांवरती चर्चा केली. त्यांच्यासोबत अनेक वैचारिक व दैनंदिन जीवनातील गोष्टींवरती निखळ संवाद साधला . तसेच त्यांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी अजिंक्य पाटील, अंकित दळवी, प्रथमेश फडतरे, राज हिरलोस्कर, संकेत खोत, यश केकलेकर तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.