चंद्रदीप नरकेंच्या हस्ते जयसिंगराव यशवंत पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

कोल्हापूर : क|| ठाणे गावचे सुपुत्र, कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याचे मा.व्हाईस चेअरमन, कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक, यशवंत सहकार समूहाचे संस्थापक व सहकारातील दीपस्तंभ स्व.जयसिंगराव यशवंत पाटील  यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते अनावरण झाले. दादांचा हा पुतळा पुढच्या पिढ्यांना सहकाराची शिदोरी देत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच काशीनाथ पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक अजित नरके, क||ठाणे गावचे प्रथम.लोकनियुक्त सरपंच व कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिष पाटील,मानसिंग पाटील,विजय पाटील, जयकिरण पाटील,राजीव परीट, आबाजी कांबळे, बाबासो पाटील, संजय पाटील, एकनाथ मेडसिंग ,तानाजी पाटील,विश्वास पाटील,संभाजी पाटील,चंद्रशेखर पाटील , नामदेव सुतार , शिवाजी चोरगे सुरेश मेडसिंग,चंद्रकांत गुरव ,कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन, सर्व संचालक मंडळ, कुंभी बँकेचे सर्व संचालक मंडळ ,यशवंत सहकार समूहाचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, कर्मचारी, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.