राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत जयसिंगपूरातील कार्यकर्त्यांचा राजर्षी शाहू विकास आघाडीत प्रवेश

कोल्हापूर: जयसिंगपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कलकुटगी यांनी आपल्या २५० कार्यकर्त्यांसह राजर्षी शाहू विकास आघाडीत जाहीर प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील(यड्रावकर) यांच्या उपस्थितीत पार पडला.

 

या समारंभात राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते लक्ष्मण कलकुटगी,सुरज पवार,अनिल शिंगाडे, आनंद कांबळे,वैभव शिंगाडे,शिवाजी पवार,राजू गाडीवडर,तम्मा पथरवट, सुनील पाथरवट यांच्यासह प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या सोहळ्याला राजर्षी शाहू विकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लक्ष्मण कलकुटगी यांच्या सामाजिक योगदानाबद्दल संजय पाटील यड्रावकर यांनी कौतुक करताना सांगितले की, “लक्ष्मण कलकुटगी हे जयसिंगपूरमधील एक महत्त्वपूर्ण सामाजिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा राजर्षी शाहू विकास आघाडीत प्रवेश हा आघाडीसाठी मोठी शक्ती ठरणार असल्याचे सांगितले.

यावेळी लक्ष्मण कलकुटगी बोलताना म्हणाले की, “राजर्षी शाहू विकास आघाडीने आजवर केलेले कार्य व जनसामान्यांच्या विकासासाठी घेतलेला पुढाकार पाहता,मला या आघाडीसोबत काम करणे महत्त्वाचे वाटले.मी आणि माझे कार्यकर्ते आघाडीसोबत काम करत जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी अधिक मेहनत घेऊ”असे सांगितले.

यावेळी संभाजी मोरे,असलम फरास, राजेंद्र नांद्रेकर,राजू झेले,दादासो पाटील चिंचवाडकर,राहुल बंडगर, फारुख कडबी,संजय कलकुटगी, गुंडप्पा पवार,विनायक गायकवाड, इम्तियाज ओलमाने,अमर नलवडे, आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

समारंभात सुरज पवार,अनिल शिंगाडे, आनंद कांबळे,वैभव शिंगाडे,शिवाजी पवार,राजू गाडीवडर,तम्मा पाथरवट, सुनील पाथरवट,अभि पवार,प्रदीप तांदळे,यश चौगुले,अजय गाडीवडर, अजय कलकुटगी,अजय पवार,अक्षय कुराडे,संदीप भोसले,ध्रुव भोसले, महेश शिंगाडे,राकेश भोसले,चेतन कलकुटगी,कुमार राठोड,अमित भगत यांच्यासह २५० कार्यकर्त्यांनी एकत्र प्रवेश करत आघाडीसाठी काम करण्याचे वचन दिले.