कोल्हापूर: सोहाळे आणि बाचीवाडी ग्रामपंचायत सरपंच भारती कृष्णा डेळेकर यांना सन २०२४ चा राजर्षी शाहू आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाला. समरजित घाटगें दौऱ्यावर असताना त्यानी सरपंच भारती कृष्णा डेळेकर यांची भेट घेतली आणि अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राजर्षी शाहू प्रतिष्ठान, दक्ष मराठी पत्रकार संघ व जागृत शोध वृत्तपत्र यांच्या सहयोगाने मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांनी आजवर केलेल्या कामाची पोहोच पावती आहे. अशा भावना समरजित घाटगे यांनी व्यक्त केल्या.