कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील वळीवडे (ता. करवीर) येथे 3 कोटी 6 लाख रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार ऋतुराज पाटील आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच यावेळी कुमार व कन्या विद्या मंदिर वळीवडे या शाळेस 85 बेंच देण्यात आले.
याप्रसंगी सरपंच रुपाली कुसाळे, उपसरपंच सुभाष उर्फ भैय्या इंगवले, राजू वळिवडे, विजयकुमार चौगुले, सचिन चौगुले, सुहास तामगावे, प्रल्हाद शिरोटे, उमेश शिंगे, प्रकाश शिंदे, राजाराम पोवार, बाजीराव माने, रघुनाथ जगताप, ग्रामपंचायत सदस्य राजाराम मोहिते, कपिल घाटगे, अशोक माने, बली खांडेकर, शहनाज नदाफ, महेश शेळके, किशोर शेळके, किशोर कुसाळे आदी उपस्थित होते.