खानापूर जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा लोकार्पण समारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा, खानापूर (ता.भुदरगड) या जिल्हा परिषद शाळेची नुतन इमारत बांधणेसाठी 1 कोटी 57 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून सदर पुर्ण झालेल्या इमारतीचा लोकार्पण समारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

 

यावेळी आमदार प्रकाश आबिटकर,जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेएन, भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील, प्रांताधिकारी हरेश सुळ, जि.प.शिक्षणाधिकारी मिना शेंडकर, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, राहूरी कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य दत्तात्रय उगले, कल्याणराव निकम, प्रविणसिंह सावंत, बाजार समितीचे संचालक संदीप वरंडेकर, अलकेश कांदळकर, बी.डी.भोपळे, तहसीलदार अर्चना पाटील, माजी सभापती सुनिलराव निंबाळकर, वसंतराव प्रभावळे, मदनदादा देसाई, तात्यासो पाटील, बी.एस.खापरे, टी.एस.देसाई, सर्जेराव देसाई, सरपंच शोभाताई गुरव, राजेंद्र पाटील, प्रविण नलवडे यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.