कोल्हापुर – रत्नागिरी महामार्गावर अपघात : दोघे गंभीर जखमी

कोल्हापूर : कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर रत्नागिरीहून येणारी कार आणि कोल्हापूरहून केर्ली गावाच्या दिशेने येणाऱ्या मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. प्रकाश चौधरी ( वय 32)आणि अमित शिंदे (वय 30 )रा. नरवाडी, ता. मिरज असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. ही घटना बुधवारी रात्री आठ वाजता केर्ली (ता. करवीर)येथील एका हॉटेलच्या समोर घडली.

रत्नागिरी येथील रोहित बाळकृष्ण साळवी हे त्यांच्या बहिणीला घेऊन कोल्हापूर मधील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जात होते. केर्ली येथे त्यांची टियागो कार व कोल्हापूरहून केर्लीच्या दिशेने येणारी डबल सीट होंडा मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोटरसायकल वरील दोघांच्या डोक्याला मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.