आगामी निवडणुकीसाठी लोंगेचे सरपंच यांच्यासह कार्यकर्त्यांचा चंद्रदीप नरकेंना जाहीर पाठिंबा

कोल्हापूर : लोंगेचे सरपंच अजित पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी माजी आमदार चंद्रदीप नरकेंना पाठिंबा जाहीर केला. आमदार नसतानाही केलेल्या कार्यावर आपण प्रभावित झालो असून, आपल्याला आमदार करण्यासाठी आम्ही सदैव आपल्या सोबत राहू असे, अजित पाटील म्हणाले.

 

यावेळी प्रल्हाद पाटील, विठ्ठल पाटील, शशिकांत पाटील, विनायक पाटील, दीपक कांबळे, विश्वास कांबळे, आनंद कांबळे, परशुराम कांबळे, गुंडा कांबळे, सर्जेराव कांबळे, आनंद दगडू कांबळे, रंगराव कांबळे, प्रकाश कांबळे, वसंत कांबळे, राजू कांबळे, अक्षय कांबळे, सागर कांबळे, विलास कांबळे, यांच्यासह कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला.