केशवराव नाट्यगृहाच्या तांत्रिक मुद्द्यावर वादळी चर्चा

कोल्हापूर : कोल्हापुरातील रंगकर्मीणी सुकाणू समितीच्या इंद्रजीत नागेशकर व अमरजा निंबाळकर या सदस्यावर केशवराव नाट्यगृह कधी उभी राहणार ते सांगा ? अशी आक्रमक भूमिका घेत प्रश्नाची सरबत्ती केली.

खासदार शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत केशवराव नाट्यगृह पुनर्बांधणी बाबत रविवारी न्यू पॅलेस येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये नाट्यगृहाच्या तांत्रिक मुद्द्यावर वादळी चर्चा झाली. नाट्यगृह उभारणीच्या कामात सकारात्मक गती घेतली नाही, तर आंदोलनाची दिशा तीव्र करण्याचा इशारा रंगकर्मी दिला.

नाट्यगृहाचा मुळ ढाचा न हलवता पुनर्बांधणी करता येणे शक्य आहे, की नाट्यगृह पूर्णपणे जमीनदोस्त करून बांधायचे या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली.नाट्यगृहाची प्रक्रिया आचारसंहितेत अडकली तर 2 ते अडीच वर्ष ही प्रक्रिया लांबेल ,त्यामुळे रंगकर्मीच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल याचा विचार प्रशासनाने करावा अशी मागणी रंगकर्मी घोरपडे यांनी केली.

खासदार शाहू महाराज म्हणाले, येत्या दोन वर्षांमध्ये नाट्यगृह पुन्हा उभे राहील यासाठी प्रयत्न करणार असून या कामात तडजोड केले जाणार नाही. या बैठकीला मधुरिमा राजे, व्ही बी पाटील, विष्णू जोशीलकर, रवी किशोर माने ,उदय गायकवाड, ऋतुराज इंगळे, भारती पवार आदी सह रंगकर्मी, आर्किटेक्ट, अभियंता, तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545