पन्हाळा: आसुर्ले (ता.पन्हाळा) येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष व केदारलिंग वारणा सहकारी सुतगिरणीचे संस्थापक कै. भगवानराव बळवंतराव सरनोबत यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कै.भगवानराव बळवंतराव सरनोबत यांनी केलेल्या विकासकामांचा व समाजसेवेच्या स्मृती कायम आठवणीत राहाव्यात म्हणून केदारलिंग वारणा सहकारी सुतगिरणीच्या पटांगणात त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.त्या स्मारकाचे भूमिपूजन आमदार डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
केदारलिंग वारणा सहकारी सुतगिरणीचे उर्वरित काम येत्या २ ते ३ महिन्यांत पूर्णत्वास जाऊन कै.भगवानराव बळवंतराव सरनोबत यांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे यांनी सांगितले.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील,कर्णसिंह गायकवाड हातकणंगले विधानसभेचे नेते अशोकराव माने ,करवीर विधानसभेचे नेते संताजी बाबा घोरपडे,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील,पन्हाळा पंचायत समिती माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत यांच्यासह केदारलिंग वारणा सहकारी सुतगिरणीचे सर्व संचालक व जनसुराज्य शक्तीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.