बंद बंगल्याचा कडी कोयंडा तोडून रोख रक्कम लंपास

कोल्हापूर (संग्राम पाटील)

व्यंकटेश नगर न्यू वाडदे येथे काल मध्यरात्री बंद बंगला फोडून  चोरी झाली आहे. मुंबई येथील वकील सुहास कामत यांचा हा बंगला असून काही दिवसापूर्वी ते गणेशोत्सव सुट्टीसाठी आले होते. चारच दिवसांपूर्वी ते कुटुंबियासह मुंबईला निघून गेले.बंगल्यात कोणी राहत नसल्याचा व रस्त्यावरील लाईट बंद असल्याच्या संधीचा फायदा घेऊन गॅस कटरच्या साह्याने पश्चिमेकडील गेटचे लोक तोडून चोरांनी आत मध्ये प्रवेश केला.

मुख्य दरवाजाचा लोखंडी दरवाजा ही त्यांनी तोडले. बेडरूम मधील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. बेडरूममधील कपाट फोडून रोख रक्कम लंपास झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अधिक तपास गांधीनगर पोलीस करत आहेत.