कांबळवाडीतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला

कोल्हापूर : कांबळवाडी(ता.राधानगरी) येथील युवक 15 ऑगस्ट रोजी घरातून निघून गेला होता. त्याच्या मृतदेहाचा सांगाडा तुळशी धरण धामोड येथील नर्सरीमध्ये शुक्रवारी आढळून आला. कृष्णात शिवाजी मांडरेकर (वय 46) असे मृत्य युवकाचे नाव आहे.                       

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर दत्तात्रय तामकर हे तुळशी धरण नर्सरी मध्ये गुरे चारण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना हा सांगाडा आढळून आला. याची माहिती त्यांनी राधानगरी पोलिसाना कळवली.

पोलिसांनी केलेल्या तपासात, तो सांगाडा कांबळवाडी येथील बेपत्ता कृष्णात शिवाजी मांडरेकर यांचा असल्याची माहिती दिली. नातेवाईकांनी कपड्यावरून ओळख पटवली असून, सापडलेला सांगाडा कृष्णात मांडरेकर यांचा असल्याची खात्री केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत.