ग्रामपंचायत शिरोली पुलाची मार्फत सुरक्षा आरोग्य शिबिराचे आयोजन ;

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे

स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत सफाई मित्र सुरक्षा आरोग्य शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत शिरोली पुलाची मार्फत व जिल्हा परिषद कोल्हापूर स्वच्छता भारत मिशन चे उद्घाटन गटविकास अधिकारी डॉ शबाना मोकाशी पंचायत समिती हातकणंगले यांच्या शुभहस्ते व लोकनियुक्त सरपंच पद्मजा कृष्णात करपे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. विस्तार अधिकारी ए एस कटारे हे उपस्थित होते. यावेळी आरोग्य तपासणी डोळे तपासणी आयोजित केले होते. सर्व कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन दिले स्वच्छतेची प्रतिज्ञा ग्रामविकास अधिकारी ए वाय कदम यांनी दिली.

 

मोकाशी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, आरोग्य कर्मचारी हे स्वतःच्या गावाची स्वच्छता करतात पण त्यांच्या आरोग्याची कोणी दखल घेत नाही. त्यामुळे प्रत्येक तीन महिन्याला त्यांची आरोग्याची तपासणी करण्यात यावी.

स्वच्छता ही सेवा या अंतर्गत आपण स्वतःआपला परिसर स्वच्छ ठेवावा त्यानंतर प्रत्येकाला आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रवृत्त करावे असे सरपंच म्हणाल्या.

यावेळी, ग्रामविकास अधिकारी ए वाय कदम, माजी उपसरपंच कृष्णात करपे, माजी सरपंच राजेश पाटील, जेष्ठ माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या व आरोग्य सेवक अभिजीत शिंदे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.