कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे
देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांना जयंती निमित्त कबनूर येथील त्यांच्या पुतळ्यास आमदार प्रकाश आवाडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांची सामाजिक शैक्षणिक व राजकीय कार्य उल्लेखनीय होते. त्यांच्या आचार, विचारप्रमानेच आज समाजात अनेक ठिकाणी आचरण चालू असून देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांनी स्थापन केलेल्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. असे उद्गार आमदार प्रकाश आवडे यांनी काढले.
यावेळी उपसरपंच सुधीर लिगाडे, जवाहर बँकेचे संचालक बबन केटकाळे, ग्रा.पं. सदस्य मधुकर मणेरे,मनोहर मणेरे, ग्रा.पं. सदस्य समीर जमादार, ग्रा.पं. सदस्या सुलोचना कट्टी, ग्रा.पं. सदस्या रजनी गुरव, निलेश पाटील,प्रदीप मणेरे, किरण परीट, संजय कट्टी, उपस्थित होते.