मराठा आरक्षणासाठी माजी नगरसेवकाची आत्महत्या !

करमाळा: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून आंदोलने सुरू केली आहेत. परंतु आरक्षण अजूनही मिळालेले नाही याच्या निषेधार्थ करमाळ्याचे माजी नगरसेवक बलभीम विष्णू राखुंडे (वय, 80 रा कानड गल्ली,करमाळा) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजण्याची सुमारास उघडकीस आली.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती, आरक्षणासाठी माझा मनोज जरांगे यांना पाठिंबा आहे. अशी चिठ्ठी लिहून खाली सही करून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन राखुंडे यांचा मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवला.

🤙 9921334545